निवडक सुभाषिते · विद्या आणि प्रयत्न
विघ्नांनी न डगमगणारे
प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचैः प्रारभ्य विघ्नविहता विरमन्ति मध्याः । विघ्नैः पुनः पुनरपि प्रतिहन्यमानाः प्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति ॥
क्षुद्र माणसे विघ्नांच्या भीतीने कामच सुरू करत नाहीत; मध्यम माणसे काम सुरू करून विघ्न आले की सोडून देतात. पण श्रेष्ठ माणसे वारंवार विघ्नांचा मार सोसूनही, एकदा सुरू केलेले काम कधीच सोडत नाहीत.