गुणवदगुणवद्वा कुर्वता कार्यजातं परिणतिरवधार्या यत्नतः पण्डितेन । अतिरभसकृतानां कर्मणामाविपत्तेर्भवति हृदयदाही शल्यतुल्यो विपाकः ॥
काम चांगले असो वा वाईट, शहाण्याने ते करण्यापूर्वी त्याच्या परिणामाचा काळजीपूर्वक विचार करावा. अति घाईने केलेल्या कामांचे फळ मरेपर्यंत हृदयाला काट्यासारखे बोचत राहते.