निवडक सुभाषिते · Wit & Riddles
दुहेरी फसगत
पलाशमुकुलभ्रान्त्या शुकतुण्डे पतत्यलिः । सोऽपि जम्बूफलभ्रान्त्या तमलिं धर्तुमिच्छति ॥
पळसाची कळी लाल आणि बाकदार, तर जांभूळ काळे. म्हणून भुंगा पोपटाच्या लाल बाकदार चोचीला पळसाची कळी समजून तिच्यावर बसतो, आणि पोपट त्या काळ्या भुंग्याला जांभूळ समजून पकडू पाहतो.