निवडक सुभाषिते · Wit & Riddles
हरणाला पाहून सिंह पळतो?
कस्तूरी जायते कस्मात् को हन्ति करिणां शतम् । किं कुर्यात् कातरो युद्धे मृगात् सिंहः पलायते ॥
शेवटच्या ओळीचा अर्थ ‘हरणापासून सिंह पळतो’ असा वाटतो, जे अशक्य. पण प्रत्यक्षात ही तीन प्रश्नांची तीन उत्तरे आहेत. कस्तुरी कशापासून मिळते? हरणापासून (मृगात्). शंभर हत्तींना कोण मारतो? सिंह. भित्रा युद्धात काय करतो? पळतो (पलायते).