निवडक सुभाषिते · Wit & Riddles
अनामिका सार्थ ठरली
पुरा कवीनां गणनाप्रसङ्गे कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासः । अद्यापि तत्तुल्यकवेरभावात् अनामिका सार्थवती बभूव ॥
प्राचीन काळी कवींची गणना करताना करंगळीवर पहिले नाव कालिदासाचे आले. आजपर्यंत त्याच्या तोडीचा दुसरा कवी मिळाला नाही, म्हणून पुढच्या बोटाचे ‘अनामिका’ (नाव नसलेली) हे नाव सार्थ ठरले.