निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञान
कांदा तो कांदाच
कर्पूरधूलीरचितालवालः कस्तूरिकापंकनिमग्ननालः । गंगाजलैः सिक्तसमूलवालः स्वीयं गुणं मुञ्चति किं पलाण्डुः ॥
कांद्याभोवती कापराच्या चूर्णाचे आळे केले, त्याचा देठ कस्तुरीच्या लेपात बुडवला आणि मुळांना गंगाजल घातले, तरी तो आपला उग्र वास सोडतो का? कितीही चांगले वातावरण मिळाले तरी मूळ स्वभाव बदलत नाही.