निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञान
नशिबातील ठरलेले धन
यद्धात्रा निजभालपट्टलिखितं स्तोकं महद् वा धनं तत् प्राप्नोति मरुस्थलेऽपि नितरां मेरौ ततो नाधिकम् । तद्धीरो भव वित्तवत्सु कृपणां वृत्तिं वृथा मा कृथाः कूपे पश्य पयोनिधावपि घटो गृह्णाति तुल्यं पयः ॥
विधात्याने कपाळावर जेवढे धन लिहिले आहे, थोडे असो वा खूप, तेवढे वाळवंटातही मिळते, आणि सोन्याच्या मेरू पर्वतावरही त्याहून अधिक मिळत नाही. म्हणून धीर धरा, श्रीमंतांपुढे उगाच लाचारी करू नका. पाहा, घागर विहिरीत बुडवा की समुद्रात, तेवढेच पाणी भरते.