निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानतोंड भरले की माणूस वशको न याति वशं लोके मुखे पिण्डेन पूरितः । मृदंगो मुखलेपेन करोति मधुरध्वनिम् ॥तोंडात घास कोंबला की या जगात कोण वश होत नाही? मृदुंगसुद्धा त्याच्या तोंडाला, म्हणजे चामड्याला, लेप लावल्यावरच गोड वाजतो. माणसाचे तोंड भरले की तोही गोड बोलू लागतो.