निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञान
मूर्खावर औषध नाही
शक्यो वारयितुं जलेन हुतभुक् छत्रेण सूर्यातपो नागेन्द्रो निशिताङ्कुशेन समदो दण्डेन गोगर्दभौ । व्याधिर्भेषजसङ्ग्रहैश्च विविधैर्मन्त्रप्रयोगैर्विषं सर्वस्यौषधमस्ति शास्त्रविहितं मूर्खस्य नास्त्यौषधम् ॥
अग्नी पाण्याने, ऊन छत्रीने, मदोन्मत्त हत्ती तीक्ष्ण अंकुशाने, बैल आणि गाढव काठीने, रोग औषधांनी आणि विष मंत्रप्रयोगांनी आवरता येते. शास्त्रात प्रत्येक गोष्टीवर औषध सांगितले आहे, पण मूर्खावर औषध नाही.