निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञान
निळ्या कोल्ह्याचा शेवट
आत्मपक्षं परित्यज्य परपक्षेषु यो रतः । स परैर्हन्यते मूढो नीलवर्णशृगालवत् ॥
जो मूर्ख आपल्या लोकांना सोडून परक्यांमध्ये रमतो, तो त्या परक्यांकडूनच मारला जातो. गोष्टीतला निळा कोल्हा असाच मेला. निळीत रंगून तो जनावरांचा राजा झाला आणि त्याने आपल्या भाईबंद कोल्ह्यांना हाकलून दिले. पण कोल्हेकुई करताच वाघ-सिंहांनी त्याला ओळखून ठार मारले.