निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञान
रहाटाची मडकी
आपद्गतं हससि किं द्रविणान्ध मूढ लक्ष्मीः स्थिरा न भवतीति किमत्र चित्रम् । एतान् प्रपश्यसि घटान् जलयन्त्रचक्रे रिक्ता भवन्ति भरिता भरिताश्च रिक्ताः ॥
अरे धनाने आंधळ्या झालेल्या मूर्खा, संकटात पडलेल्याला का हसतोस? लक्ष्मी स्थिर राहत नाही यात नवल ते काय? रहाटाच्या या मडक्यांकडे बघ—रिकामी भरतात आणि भरलेली रिकामी होतात.