निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञान
मधल्यांची अडचण
ये च मूढतमाः लोके ये च बुद्धेः परं गताः । ते एव सुखम् एधन्ते मध्यमः क्लिश्यते जनः ॥
अगदी मूर्ख आणि बुद्धीच्या पलीकडे गेलेले ज्ञानी, हे दोघेच सुखी असतात; मधला माणूस मात्र त्रास भोगतो. मूर्खाला काळजी करण्याइतकी समज नसते, ज्ञानी काळजीच्या पलीकडे असतो, आणि अर्धवट शहाण्याला काळजी करण्यापुरतीच समज असते.