निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञान
धनाचा विरोधाभास
यदर्जितं प्राणहरैः परिश्रमैः मृतस्य तद् वै विभजन्ति रिक्थिनः । कृतं च यद् दुष्कृतमर्थलिप्सया तदेव दोषापहतस्य यौतकम् ॥
जीव कंठाशी आणणाऱ्या कष्टांनी माणूस जे धन कमावतो, ते तो मेल्यावर वारस वाटून घेतात. ते धन मिळवताना लोभापायी केलेली पापे मात्र त्याच्या एकट्याच्या वाट्याला उरतात.