निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञान
नशिबाचा लेख
पत्रं नैव यदा करीरविटपे दोषो वसन्तस्य किं नोलूकोऽप्यवलोकते यदि दिवा सूर्यस्य किं दूषणम् । धारा नैव पतन्ति चातकमुखे मेघस्य किं दूषणं यत् पूर्वं विधिना ललाटलिखितं तन्मार्जितुं कः क्षमः ॥
करीलाच्या झुडपाला पाने आली नाहीत, तर त्यात वसंताचा काय दोष? घुबडाला दिवसा दिसत नाही, तर त्यात सूर्याचा काय दोष? चातकाच्या तोंडात पावसाचे थेंब पडत नाहीत, तर त्यात ढगाचा काय दोष? विधात्याने आधीच कपाळावर जे लिहून ठेवले आहे, ते पुसण्यास कोण समर्थ आहे?