प्रमुख उपनिषदे · कठोपनिषद्
“मला कुणाला द्याल?”
स होवाच पितरं तत कस्मै मां दास्यसीति । द्वितीयं तृतीयं तं होवाच मृत्यवे त्वा ददामीति ॥ ४ ॥
म्हणून नचिकेता वडिलांकडे गेला. “बाबा,” त्याने विचारले, “आपण मला कुणाला देणार?” वडील काहीच बोलले नाहीत. मुलाने पुन्हा विचारले, आणि तिसऱ्यांदाही. शेवटी वडिलांचा संताप अनावर झाला. “तुला मी मृत्यूला देतो!” प्रश्न शांत होता, पण त्यात ठपका होता, आणि तो वडिलांना लागला. रागाच्या भरात कुणीही “जा, मसणात जा!” असे बोलून जातो, तसेच हे शब्द. पण त्या काळी यज्ञाच्या वेळी उच्चारलेला शब्द बंधनकारक असे. मुलगा वडिलांचा शब्द खरा मानतो.