बिरहिन ऊभी पंथ सिरि, पंथी बूझै धाइ।
एक सबद कहि पीव का, कवर मिलैंगे आइ॥
विरहिणी वाटेच्या तोंडाशी उभी आहे. वाटसरू दिसला की ती धावत जाऊन विचारते: ‘माझ्या प्रियकराचा एक तरी शब्द सांगा. तो मला भेटायला कधी येणार?’
वाटेवर उभी असलेली ही पत्नी म्हणजे जीव, आणि परदेशी गेलेला पती म्हणजे देव.