संत कबीर · सद्गुरू आणि शब्द
अमृताचे गाठोडे
अमृत केरी मोटरी, शिर से धरी उतार। जाहि कहौं मैं एक है, सो मोहिं कहै दुइ चार॥
अमृताचे गाठोडे मी डोक्यावरून उतरवून खाली ठेवले, कबीर सांगतात. पण ज्याला मी सांगतो की देव एक आहे, तोच उलट मला दोन-चार सुनावतो. अमृत म्हणजे कबीरांची शिकवण. ओझ्यासारखी ती त्यांनी इतके दिवस वाहिली, आणि आता कोणालाही घेता यावी म्हणून खाली ठेवली आहे. ‘दोन-चार सुनावणे’ म्हणजे खडसावणे; पण इथे ते शब्दशःही खरे ठरते. कबीर एक देव देऊ करतात, आणि लोक त्यांना अनेक देव मोजून दाखवतात, वर चार कडू शब्दही ऐकवतात.