एकवृक्षसमारूढा नानावर्णा विहङ्गमाः । प्रभाते दिक्षु दशसु यान्ति का तत्र वेदना ॥
एकाच झाडावर नाना रंगांचे पक्षी रात्री एकत्र बसतात आणि पहाट होताच दाही दिशांना उडून जातात. त्यात दुःख करण्यासारखे काय आहे? एका घरात राहणारी माणसेही अशीच: काही काळ एकत्र, मग ज्याची त्याची वाट वेगळी.