नीरक्षीरविवेके हंस आलस्यम् त्वम् एव तनुषे चेत् । विश्वस्मिन् अधुना अन्यः कुलव्रतं पालयिष्यति कः ॥
हे हंसा, दूध आणि पाणी वेगळे करण्याबद्दल तुझी ख्याती आहे. तूच त्यात आळस करू लागलास, तर आज जगात तुझ्या कुळाचे हे व्रत दुसरे कोण पाळेल? येथे हंस म्हणजे बरे-वाईट ओळखण्याची देणगी लाभलेला माणूस.