निवडक सुभाषिते · चारित्र्य आणि आचरण
चातकाचा स्वाभिमान
एक एव खगो मानी चिरंजीवतु चातकः । म्रियते वा पिपासार्तो याचते वा पुरंदरम् ॥
खरा स्वाभिमानी पक्षी एकच: चातक, तो चिरंजीव होवो. चातक फक्त पावसाचे थेंब पितो. म्हणून तहानेने व्याकूळ झाला तरी तो एक तर तहानेने मरतो, नाही तर पाऊस देणाऱ्या देवराज इंद्राकडेच याचना करतो. कमी दर्जाच्या कोणापुढे तो हात पसरत नाही.