कोकिलानां स्वरो रूपं स्त्रीणां रूपं पतिव्रतम् । विद्या रूपं कुरूपाणां क्षमा रूपं तपस्विनाम् ॥
कोकिळेचे सौंदर्य तिचा स्वर, आणि स्त्रीचे सौंदर्य तिचे पतिव्रत्य. कुरूप माणसाचे सौंदर्य त्याची विद्या, आणि तपस्व्यांचे सौंदर्य त्यांची क्षमा. कोकिळा दिसायला साधी, काळी असते; तिचा गळा हेच तिचे सौंदर्य.