निवडक सुभाषिते · Wit & Riddles
पाणिनीचे एक सूत्र
काचं मणिं काञ्चनमेकसूत्रे मुग्धा निबध्नन्ति किमत्र चित्रम् । विचारवान् पाणिनिरेकसूत्रे श्वानं युवानं मघवानमाह ॥
भोळी माणसे काच, मणी आणि सोने एकाच दोऱ्यात ओवतात, यात नवल काय? विचारवंत पाणिनीनेसुद्धा कुत्रा, तरुण आणि इंद्र यांना एकाच सूत्रात बांधले. ‘सूत्र’ म्हणजे दोरा आणि व्याकरणाचा नियमही; पाणिनीच्या ‘श्वयुवमघोनाम्’ सूत्रात हे तीन शब्द केवळ त्यांची रूपे सारखी चालतात म्हणून एकत्र आले आहेत.