निवडक सुभाषिते · Wit & Riddles
विधवेच्या कपाळी कुंकू?
करोति शोभामलके स्त्रियाः को दृश्या न कान्ता विधिना च कोक्ता । अङ्गे तु कस्मिन् दहनः पुरारेः सिन्दूरबिन्दुर्विधवाललाटे ॥
शेवटच्या ओळीचा अर्थ ‘विधवेच्या कपाळावर कुंकवाचा टिळा’ असा वाटतो, जे रूढीनुसार अशक्य. पण ही तीन प्रश्नांची उत्तरे आहेत. स्त्रीच्या भांगाची शोभा कोण वाढवतो? कुंकवाचा टिळा. रूढीने कोणत्या स्त्रीचे दर्शन अशुभ मानले? विधवेचे. शंकराच्या कोणत्या अंगात अग्नी आहे? कपाळात.