निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञान
प्रत्येकापुढे हात पसरू नका
रे रे चातक सावधानमनसा मित्र क्षणं श्रूयतामम्भोदा बहवो वसन्ति गगने सर्वेऽपि नैतादृशाः । केचिद्वृष्टिभिरार्द्रयन्ति धरणीं गर्जन्ति केचिद्वृथा यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वचः ॥
पावसाच्या थेंबांवरच जगणाऱ्या मित्रा चातका, क्षणभर लक्ष देऊन ऐक. आकाशात पुष्कळ ढग आहेत, पण सगळेच सारखे नसतात. काही पावसाने पृथ्वी भिजवतात आणि काही नुसतेच गर्जतात. ज्याला ज्याला पाहशील, त्याच्या त्याच्यापुढे दीनवाणे बोलू नकोस.