निवडक सुभाषिते · व्यवहारज्ञानसौम्यपणाने बलवानही वश होताततरसा ये न शक्यन्ते शस्त्रैः सुनिशितैरपि । साम्ना तेऽपि निगृह्यन्ते गजा इव करेणुभिः ॥ज्यांना धारदार शस्त्रांच्या बळानेही जिंकता येत नाही, तेही सौम्य उपायांनी वश होतात—जसे हत्तिणींच्या साहाय्याने रानटी हत्ती पकडले जातात.