प्रमुख उपनिषदे · ऐतरेयोपनिषद्
वासाने नाही
तत्प्राणेनाजिघृक्षत् तन्नाशक्नोत्प्राणेन ग्रहीतुम् । स यद्धैनत्प्राणेनाग्रहैष्यदभिप्राण्य हैवान्नमत्रप्स्यत् ॥ ४ ॥
त्याने प्राणाने ते पकडू पाहिले, पण प्राणाला ते धरता आले नाही. ते धरता आले असते, तर नुसता अन्नाचा वास घेतल्यानेच पोट भरले असते. इथे प्राण म्हणजे नाकातला श्वास. फोडणीचा वास साऱ्या गल्लीत दरवळतो, पण त्याने गल्लीतल्या कुणाचेच पोट भरत नाही.