- 1कल्याणीचे चालुक्य: एका दृष्टिक्षेपातब्रह्मदेव संध्या करत बसला होता. तेवढ्यात इंद्र देव त्याच्याकडे गाऱ्हाणे घेऊन आला, असे कवी बिल्हण सांगतात. पृथ्वीवरचे लोक देवांना विसरत चालले होते. यावर उपाय म्हणून एक वीर निर्माण कर, अशी विनवणी इंद्राने केली. तेव्हा ब्रह्मदेवाने आपल्या चुलु…
- 2तैलपांनी परत आणलेले चालुक्य नाव, ९७३शके ८९५, म्हणजे इ.स. ९७३-४. राष्ट्रकूट राजे दुसरे कर्क यांच्यासमोर युद्धात चालुक्य घराण्यातले एक जण उभे ठाकले. त्यांचे नाव तैलप. कर्क तैलपांपुढे “हरले, आणि बहुधा त्यांच्याच हातून मारले गेले”. कर्कांबरोबरच “राष्ट्रकूट घराणे अस्तित्वात उरले न…
- 3चोळांची स्वारी आणि होत्तूरची शिळा, १००७ही शिळा एक चौकोनी ठोकळा आहे. वर पायऱ्यांचा माथा, आणि खाली सहा आडवे पट्टे. सर्वांत वरच्या पट्ट्यात एक देव बसलेला आहे; त्याच्या दोन्ही बाजूंना एकेक चवरीवाला. त्याखाली दोन देवता एका वीराला स्वर्गात घेऊन जात आहेत, एक या बाजूला, एक त्या बाजूला.…
- 4पहिले सोमेश्वर, कल्याण आणि चोळचालुक्य राजांना बातमी आली: युद्धाला उत्सुक असलेले चोळ राजे आपल्या देशातून निघाले आहेत. ते इरट्टमंडलमपर्यंत आले आहेत; तिथली माणसे मोठी शूर. आणि तिथले अनेक जिल्हे आणि गावे त्यांनी उद्ध्वस्त केली आहेत. हे ऐकताच चालुक्य राजे ताडकन उठले. त्यांचे…
- 5तुंगभद्रेत चालत गेलेले राजे, १०६८चोळ राजे वीरराजेंद्र यांनी एका नदीकाठी लढाई जिंकली होती. त्यांच्याशी लढलेल्या अनेक सरदारांची शिरे त्यांनी कापली होती. त्यांचा लेख म्हणतो, ती शिरे ते आपल्या मोठ्या नगरात ठोकून टांगणार होते, इतक्यात त्यांच्या जुन्या शत्रूंचे एक पत्र आले. हे श…
- 6भाऊ दुसरे सोमेश्वर यांच्याविरुद्ध विक्रमादित्यराजे आणि राणी शिवाच्या एका देवळात उघड्या जमिनीवर झोपत. राजे देवाच्या पूजेसाठी स्वतःच्या हातांनी फुले वेचत. राणी देवळाची जमीन झाडत, आणि शेणाने सारवत. राज्याचा भार त्यांनी मंत्र्यांवर सोपवला होता, कारण त्यांना पुत्र नव्हता. हे राजे म्हणजे चाल…
- 7करहाटकातील चंद्रलेखा यांचे स्वयंवरराजांचा हेर करहाटकाला गेला होता. तो परत येईपर्यंत राजांचे अंग खंगत गेले, आणि चेहरा फिका पडला. ते एका राजकन्येची खबर येण्याची वाट पाहत होते. हे राजे म्हणजे चालुक्य घराण्याचे विक्रमादित्य. कल्याण ही त्यांची राजधानी. कवी बिल्हण यांनी एका दीर्घ…
- 8कल्याणमधील काश्मिरी कवी बिल्हणकर्णाट देशात एक कवी हत्तींवरून प्रवास करत, तेव्हा त्यांचे छत्र राजांच्या पुढे उंच धरून नेले जाई. असे कल्हण काश्मीरच्या राजांच्या आपल्या बखरीत सांगतात. हे कवी काश्मिरी होते, त्यांचे नाव बिल्हण. काश्मीरचे राजे कलश यांच्या कारकिर्दीत त्यांनी घ…
- 9विज्ञानेश्वर आणि कल्याण नगरीविक्रमादित्यांच्या राज्यात लोक रात्री घरांची दारे लावायची तसदीसुद्धा घेत नसत. असे त्यांचे कवी बिल्हण सांगतात: “चोरांऐवजी खिडक्यांच्या झरोक्यांतून चंद्राचे किरण आत येत.” विक्रमादित्य चालुक्यांचे राजे होते, आणि त्यांची राजधानी कल्याण होती. रा…
- 10कलचुरी बिज्जलांनी घेतलेले कल्याणचालुक्य अजूनही आपल्या राजधानीतून, कल्याणमधून, राज्य करत होते. पण त्यांची सत्ता झपाट्याने ढासळत होती. त्यांचे राजे होते तिसरे तैल. ते इ.स. ११५०-५१ मध्ये गादीवर आले. त्यांच्या हाताखालचे काही सरदार आता बलवान आणि उद्धट झाले होते. पूर्वेला तेलंग…