- 1ध्रुवबाळउत्तानपाद नावाचा एक राजा होता. तो मनूचा मुलगा. मनू म्हणजे सगळ्या माणसांचा आदिपिता. राजाला दोन राण्या होत्या, सुनीती आणि सुरुची. राजाचे सुरुचीवर जास्त प्रेम होते. सुनीतीकडे तो फारसे लक्ष देत नसे. ध्रुव हा सुनीतीचा मुलगा. एके दिवशी राजा सुरुच…
- 2अंबरीष आणि दुर्वासनाभाग राजाचा मुलगा अंबरीष सगळ्या पृथ्वीवर राज्य करत होता. त्याच्याकडे अमाप संपत्ती होती. पण त्याला ती सगळी स्वप्नासारखी वाटे. त्याचे मन विष्णूला वाहिलेले होते. दिवसभर तो परमेश्वराचेच स्मरण करी. परमेश्वराचा महिमा सांगायला त्याला फार आवडे. पर…
- 3अजामिळकान्यकुब्ज नगरात अजामिळ नावाचा एक ब्राह्मण राहत होता. एके काळी तो चांगले आयुष्य जगत होता. पण एका दासीच्या नादी लागून तो तिचा नवरा झाला, आणि त्याचे सगळे चांगले आचार सुटले. जुगार, फसवाफसवी आणि चोरी करून तो कुटुंबाचे पोट भरत असे. लोकांशी तो क्…
- 4जडभरतफार पूर्वी भरत नावाचा एक राजा होता. तो परमेश्वराचा, म्हणजे विष्णूचा, मोठा भक्त होता. त्याच्या वडिलांनी आणि आजोबांनी जसे केले, तसेच त्यानेही अनेक युगे प्रजेवर मायेने राज्य केले. आपल्या या भारत देशाला त्याच्याच नावावरून भारत म्हणतात. राज्य कर…
- 5नचिकेता आणि यमफार पूर्वी वाजश्रवस नावाचा एक ब्राह्मण होता. त्याने एक मोठा यज्ञ केला. त्या यज्ञाचे फळ मिळावे, अशी त्याची इच्छा होती. यज्ञ संपल्यावर त्याने आपले सगळे काही दक्षिणा म्हणून पुरोहितांना देऊन टाकले. त्याला नचिकेता नावाचा मुलगा होता. तो अजून लहान…
- 6सत्यकाम जाबालफार पूर्वी सत्यकाम नावाचा एक मुलगा आपल्या आईबरोबर राहत होता. आईचे नाव जबाला. सत्यकाम या नावाचा अर्थ आहे, सत्यावर प्रेम करणारा. सत्यकामाला गुरूकडे राहून शिकायचे होते. त्या काळी शिष्य अनेक वर्षे गुरूच्या घरी राहत असे. तो गुरूची सेवा करी, त्या…
- 7विश्वामित्र आणि कामधेनूफार पूर्वी विश्वामित्र नावाचा एक पराक्रमी राजा होता. तो गाधी राजाचा मुलगा. तो जन्माने क्षत्रिय होता. हजारो वर्षे त्याने पृथ्वीवर राज्य केले. एकदा तो सैन्य घेऊन पृथ्वीवर फिरायला निघाला. फिरता फिरता तो वसिष्ठांच्या आश्रमात येऊन पोहोचला. वसिष्…
- 8विश्वामित्र आणि मेनकाविश्वामित्र एके काळी पराक्रमी राजा होते. वसिष्ठ ऋषींची एक अद्भुत गाय त्यांनी जबरदस्तीने नेण्याचा प्रयत्न केला होता. पण वसिष्ठ ब्राह्मण होते. केवळ ब्राह्मणाच्या तेजाने वसिष्ठांनी राजाची सगळी सैन्ये आणि सगळी अस्त्रे हरवली. म्हणून विश्वामित्रा…
- 9च्यवन आणि सुकन्याफार पूर्वी भृगू महर्षींचे पुत्र च्यवन एका सरोवराकाठी तपश्चर्येला बसले. च्यवन खांबासारखे निश्चल बसून राहिले. इतका काळ बसले, की त्यांच्या अंगावर वारूळ वाढले. त्यावर वेली पसरल्या. मुंग्यांचे थवे त्यांच्या अंगावरून फिरू लागले. शेवटी ते मातीच्या…
- 10अष्टावक्रफार पूर्वी उद्दालक नावाचे एक ऋषी होते. त्यांना श्वेतकेतू नावाचा मुलगा होता, आणि सुजाता नावाची मुलगी. कहोड नावाचा त्यांचा एक शिष्य होता. कहोडांनी पुष्कळ वर्षे मनापासून गुरूंची सेवा केली. उद्दालक त्यांच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी कहोडांना आपल…
- 11ऋष्यशृंगफार पूर्वी विभांडक नावाचे एक ऋषी एका मोठ्या सरोवराकाठी तपश्चर्या करत होते. एके दिवशी ते सरोवरात चूळ भरत होते. तेवढ्यात त्यांना उर्वशी अप्सरा दिसली, आणि त्यांचे वीर्य पाण्यात पडले. तिथे एक तहानलेली हरिणी आली. पाण्याबरोबर तिने ते प्यायले, आणि…
- 12आरुणी आणि उपमन्यूफार पूर्वी धौम्य नावाचे एक ऋषी होते. ते शिष्यांना वेद शिकवत. प्रत्येक शिष्याची ते वेगळ्या प्रकारे परीक्षा घेत. त्यांच्या शिष्यांपैकी दोघे होते आरुणी आणि उपमन्यू. आरुणी पांचाल देशातून आला होता. एके दिवशी धौम्य त्याला म्हणाले, “शेतावर जा. पाण…
- 13उत्तंक आणि कुंडलेफार पूर्वी वेद नावाचे एक गुरू होते. ते शिष्यांना वेद शिकवत. ते स्वतः शिष्य होते, तेव्हा गुरूंच्या घरी त्यांनी खूप हाल सोसले होते. म्हणून ते आपल्या शिष्यांवर कधीच हुकूम चालवत नसत. पौष्य राजाने वेदांना आपले पुरोहित नेमले. एकदा एका यज्ञाच्या क…
- 14मांडव्य ऋषीकुरूंच्या राजघराण्यात एकेकाळी विदुर नावाचा एक ज्ञानी पुरुष होता. धर्म कोणता, हे त्याला नीट कळत असे. कुरूंच्या भल्यासाठी तो नेहमी झटत असे. पण विदुर जसा दिसे, त्याहून तो फार मोठा होता. तो म्हणजे न्यायाचा देव धर्म. तोच पृथ्वीवर माणूस म्हणून जन…
- 15धर्मव्याधकौशिक नावाचा एक ब्राह्मण होता. तो तपस्वी होता, आणि त्याने सगळ्या वेदांचे अध्ययन केले होते. शिकण्यासाठी तो आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांना घरी सोडून आला होता. एके दिवशी तो एका झाडाखाली बसून वेदमंत्र म्हणत होता. झाडावर उंच एक बगळी बसली होती. ति…