- 1राणी झालेली मांजरफार पूर्वी काश्मीरवर एक मोठा राजा राज्य करत होता. काश्मीरच्या सगळ्यात थोर राजांपैकी तो एक होता. त्याच्या पुष्कळ राण्या होत्या, पण मुलगा एकही नव्हता. “एवढी लग्ने करून काय उपयोग?” तो ओरडला. “देवाने मला एक मुलगा काही दिला नाही. मी असाच मरून जा…
- 2राज्य परत मिळवणारी राजकन्याएका राजाला शेजारच्या देशाच्या राजाने लढाईत हरवले. जीव वाचवण्यासाठी त्याला पळावे लागले. त्याच्याबरोबर त्याची राणी, त्यांचा मुलगा राजकुमार आणि राजकुमाराची बायको राजकन्या होती. ते शक्य तितक्या घाईने एका लहानशा, आडबाजूच्या खेड्यात गेले. ते खेडे…
- 3शिराझहून आलेला माणूसफार पूर्वी इराणच्या दक्षिणेकडच्या शिराझ शहरातला एक माणूस काश्मीरला आला. तो तिथल्या एका जुन्या मित्राकडे गेला आणि तीन दिवस त्याच्याकडे राहिला. काश्मिरी मित्राला आपल्या पाहुणचाराचा अभिमान होता. पाहुण्यासाठी त्याने मोठी मेजवानी दिली. जेवताना य…
- 4दोन भाऊएका राजाचे राणीवर फार प्रेम होते. राणीचेही त्याच्यावर तितकेच प्रेम होते. त्यांना दोन मुलगे होते. दोघेही देखणे, हुशार, सुस्वभावी आणि आज्ञाधारक होते. आपल्या आईवडिलांइतके चांगले कोणीच नाही, असे त्या मुलांना वाटे. अशा घरात सुख नांदणारच होते. पण…
- 5दगाबाज मित्रफार पूर्वी एक मोठा आणि श्रीमंत राजा होता. त्याने आपल्या मुलाला व्यापारी म्हणून जगात पाठवायचे ठरवले. त्यामुळे राजकुमाराला लोकांची आणि देशाची ओळख होईल. पुढे त्याची गादीवर बसायची वेळ येईल, तेव्हा तो अधिक शहाणपणाने राज्य करू शकेल, असा राजाचा वि…
- 6हुशार कोल्हानांगरणीचे दिवस होते. एक शेतकरी सकाळीच शेताकडे निघाला. “लवकर मागोमाग जेवणाचे मडके घेऊन ये,” असे त्याने बायकोला सांगितले. भात शिजल्यावर तिने थोडा भात त्याच्यासाठी नेला. शेतात थोड्या अंतरावर तिने तो ठेवला. “हे तुझे जेवण,” ती म्हणाली. “मला आत्त…
- 7धाडसी राजकन्यापूर्वी दोन मोठे आणि श्रीमंत राजे होते. एकाला एक फार देखणा मुलगा होता. दुसऱ्याला एक अतिशय सुंदर मुलगी होती. राजकुमार आणि राजकन्या दोघेही लग्नाच्या वयाचे झाले होते. म्हणून दोन्ही राजे आपापल्या मुलांसाठी चांगले स्थळ शोधायला सगळीकडे दूत पाठवत ह…
- 8तीन राजपुत्रएक राजा होता. तो विद्वत्ता, सत्ता आणि शौर्य यांसाठी प्रसिद्ध होता. त्याला तीन मुलगे होते. तिघेही अशा वडिलांना शोभणारे होते. शूर, हुशार, देखणे, शहाणे आणि सुस्वभावी. एके दिवशी आपल्यानंतर राज्य कोणी करावे, हे ठरवायचे राजाच्या मनात आले. त्याने…
- 9दुष्ट मुलांची फजितीएक फार श्रीमंत म्हातारा होता. आता आपण मरणार, असे त्याला वाटले. म्हणून त्याने मुलांना बोलावले आणि सगळी मालमत्ता त्यांच्यात वाटून दिली. पण त्यानंतर कितीतरी वर्षे तो मेला नाही. त्यातली बरीच वर्षे दुःखात गेली. म्हातारपणाचा थकवा तर होताच. शिवाय…
- 10एकीचे बळएकदा काश्मीरमध्ये भयंकर दुष्काळ पडला. एखाद्या मोठ्या राक्षसासारखा तो सगळा देश व्यापून गेला. कितीतरी घरांत मृत्यू आणि दुःख घेऊन आला. अशा वेळी चार भावांनी देश सोडून जायचे ठरवले. एके दिवशी वाटेत लागणारे सामान बांधून ते निघाले. काही वेळाने ते न…
- 11कोल्हा राजाफार पूर्वी कोल्हे राजा निवडायला एकत्र जमले. सिंहांना राजा होता. वाघांना, बिबट्यांना आणि लांडग्यांनाही होता. कुत्र्यांना आणि इतर प्राण्यांनाही आपापले राजे होते. म्हणून आपल्यालाही एक राजा असावा, असे कोल्ह्यांना वाटले. सभेत मार्ग दाखवणारा आणि…
- 12विणकराची प्रार्थनाएक विणकर होता. तो दर वर्षी एक सुंदर वस्त्र विणत असे आणि राजाला देत असे. राजाला ते इतके आवडे, की त्या बदल्यात तो त्याला नेहमी दोन हजार रुपये देत असे. विणकर महत्त्वाकांक्षी होता. राजा आणि दरबारी त्याच्या कामाची स्तुती करत. पण त्याचे कधीच समाध…
- 13राजकन्येला नवरा कसा सापडलाएका राजाला आपल्या मुलासाठी, राजपुत्रासाठी, बायको शोधायची होती. म्हणून त्याने आपल्या मुख्य वजिराला योग्य स्थळ शोधायला पाठवले. प्रवासात त्या वजिराला दुसऱ्या एका राजाचा मुख्य वजीर भेटला. तोही असाच फिरत होता. त्याच्या धन्याला एक सुंदर मुलगी होत…
- 14चतुर पोपटएका फकिराकडे एक फार हुशार, बोलका पोपट होता. फकिराचा त्याच्यावर फार जीव होता. तो त्याला मोलाचा मानत असे. एके दिवशी फकिराला बरे वाटत नव्हते. तो पोपटाला म्हणाला, “तू मला कधी काही बातमी सांगत नाहीस. काहीच सांगत नाहीस.” “बरे, सांगेन,” पोपट म्हणा…
- 15अक्रोड आणि भोपळाएक माणूस होता. तो कधीच समाधानी नसे. एके दिवशी तो एका अक्रोडाच्या झाडाखाली बसला होता. जवळच एक मोठा लाल भोपळा वाढत होता. “देवा,” तो माणूस म्हणाला, “किती वेडा आहेस रे तू! एवढ्या मोठ्या झाडाला तू इतकी लहान फळे देतोस. आणि तो वेल बघ, त्याच्या प्र…
- 16गावचे बावळटएके दिवशी सकाळी एक शेतकरी कामाला निघाला. कमरेच्या कापडात त्याने दहा चपात्या बांधल्या होत्या. दिवसभराचे त्याचे जेवण तेवढेच होते. घरापासून थोडा दूर गेला नाही तोच त्याला कडकडून भूक लागली. तो खायला बसला. एक, दोन, तीन, चार चपात्या संपल्या, पण त्…
- 17कर्म की धर्म?ही गोष्ट एका ब्राह्मणाच्या मुलाची आहे. वडील वारल्यावर तो मुलगा इतका आजारी पडला, की मरता मरता वाचला. एका जोग्याने त्याला बरे केले. पुढे त्या जोग्याने मुलाच्या डोळ्यांत एक जादूचे अंजन घातले, आणि मुलाला पंख फुटले. जोग्याने त्याला राजाच्या खजिन…
- 18गगर वोल आणि त्याचा नोकर रतुनगगर वोल कारदार होता. कारदार म्हणजे गावांवर देखरेख करणारा आणि महाराजांच्या वाट्याचे धान्य गोळा करणारा सरकारी अधिकारी. त्याचा रतुन नावाचा एक नोकर होता. तो होता मूर्ख. एकदा गगर वोल त्याच्या एका गावाला चालला होता. रतुन त्याच्याबरोबर होता. वाटेत…
- 19दुष्ट राण्याएका राजाला तीन राण्या होत्या. त्यांतल्या दोघींवर त्याचे जास्त प्रेम होते, कारण दोघींनाही एकेक मुलगी झाली होती. तिसऱ्या राणीला मात्र एकही मूल झाले नव्हते. शेवटी तिसरी राणी गरोदर राहिली. तिला मुलगा होईल, या कल्पनेने बाकीच्या दोघी राण्या फार घ…
- 20लाकडी घोडाही गोष्ट दोन राजपुत्रांची आहे. एका राजाला तीन राण्या होत्या. तरीही त्याला मुलगा नव्हता. याचे त्याला फार दुःख होते. आपल्यानंतर आपल्याच रक्ताच्या कोणीतरी देशावर राज्य करावे, असे त्याला वाटत होते. पुढचा राजा म्हणून निवडावा, असा दुसरा कोणी योग्…
- 21शेतकऱ्याची चतुर मुलगीएक कोळीण मासे विकत, आरोळ्या देत राजवाड्याजवळून चालली होती. राणी खिडकीत आली. कोळणीकडे काय आहे ते पाहायला तिने तिला हाताने खूण करून बोलावले. तेवढ्यात टोपलीच्या तळाशी एक मोठा मासा उड्या मारू लागला. राणीने विचारले, “हा नर आहे की मादी? मला मादी…