- 1ईदगाहरमजानचे पुरे तीस रोजे संपले आणि आज ईद उजाडली आहे. किती रम्य, किती प्रसन्न पहाट आहे ही! झाडांवर काही आगळीच हिरवाई आहे, शेतांत काही आगळीच टवटवी, आभाळात काही आगळीच लाली. आजचा सूर्य तर पाहा, किती गोजिरा, किती शीतल! जणू साऱ्या जगाला ईदच्या शुभेच…
- 2पंच परमेश्वर१ जुम्मन शेख आणि अलगू चौधरी यांची घट्ट मैत्री होती. शेती दोघांची भागीदारीत होई. देण्याघेण्याच्या काही व्यवहारांतही त्यांची भागीदारी होती. एकाचा दुसऱ्यावर अढळ विश्वास होता. जुम्मन हजला गेले तेव्हा आपले घर अलगूच्या हवाली करून गेले होते, आणि अ…
- 3मिठाचा दारोगामिठाचे नवे खाते निघाले आणि देवाने दिलेल्या या वस्तूचा व्यवहार करायला बंदी झाली, तेव्हा लोक चोरून-लपून तिचा व्यापार करू लागले. नाना तऱ्हेच्या लबाड्या-लटपटींना सुरुवात झाली; कोणी लाच चारून काम साधून घेई, तर कोणी चलाखीने. अधिकाऱ्यांची पाचही बो…
- 4म्हातारी काकी१ म्हातारपण म्हणजे बहुधा बालपणाचे पुन्हा येणेच असते. म्हाताऱ्या काकींमध्ये जिभेच्या चवीखेरीज दुसरी कोणतीच आस उरली नव्हती; आणि आपल्या दुःखाकडे लोकांचे लक्ष वेधायला रडण्याखेरीज दुसरा आधारही नव्हता. सारी इंद्रिये—डोळे, हात, पाय—केव्हाच साथ सोड…
- 5पौषाची रात्रहल्कू आत येऊन बायकोला म्हणाला—सहना आलाय. आण, ठेवलेले रुपये आहेत ते त्याला देऊन टाकतो. कसा का होईना, एकदाचा पिच्छा तरी सुटेल. मुन्नी झाडलोट करत होती. मागे वळून म्हणाली—तीनच तर रुपये आहेत. ते देऊन टाकले तर कांबळं कुठून येणार? माघ-पौषाच्या रात…
- 6थोरले भाऊसाहेबमाझे भाऊसाहेब माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठे होते; पण फक्त तीन वर्ग पुढे. मी ज्या वयात शिकायला सुरुवात केली त्याच वयात त्यांनीही केली होती; पण शिक्षणासारख्या महत्त्वाच्या बाबतीत घाईगर्दी करणे त्यांना पसंत नव्हते. या इमारतीचा पाया चांगला भक्…
- 7ठाकुराची विहीरजोखूने तांब्या तोंडाला लावला, तो पाण्याला भयंकर घाण येत होती. तो गंगीला म्हणाला—हे कसलं पाणी? नुसत्या वासानं प्यायलं जात नाही. इकडे घसा कोरडा पडलाय आणि तू कुजकं पाणी पाजते आहेस. गंगी रोज संध्याकाळी पाणी भरून ठेवीत असे. विहीर लांब होती; पुन्…
- 8दोन बैलांची कथाजनावरांमध्ये गाढव सर्वांत बुद्धिहीन समजला जातो. एखाद्या माणसाला पहिल्या नंबरचा मूर्ख म्हणायचे असले, की आपण त्याला गाढव म्हणतो. गाढव खरोखरच मूर्ख आहे, की त्याच्या साधेपणाने, त्याच्या निरुपद्रवी सहनशीलतेने त्याला ही पदवी मिळवून दिली आहे, हे न…
- 9मंत्र१ संध्याकाळची वेळ होती. डॉक्टर चड्ढा गोल्फ खेळायला जायच्या तयारीत होते. मोटार दारासमोर उभी होती, तोच दोन भोई एक डोली घेऊन येताना दिसले. डोलीच्या मागोमाग एक म्हातारा काठी टेकत टेकत येत होता. डोली दवाखान्यासमोर येऊन थांबली. म्हाताऱ्याने हळूहळ…
- 10मोठ्या घरची लेकबेनीमाधवसिंह गौरीपूर गावचे जमीनदार आणि नंबरदार होते. त्यांचे आजोबा एके काळी मोठे धनधान्यसंपन्न होते. गावातला पक्का तलाव आणि देऊळ, ज्यांची आता डागडुजीसुद्धा अवघड झाली होती, हे त्यांचेच कीर्तिस्तंभ. म्हणतात, एके काळी या दारात हत्ती झुलत असे;…
- 11कफनझोपडीच्या दारात बाप आणि लेक दोघे एका विझलेल्या शेकोटीपुढे गुपचूप बसले आहेत, आणि आत लेकाची तरुण बायको बुधिया बाळंतपणाच्या कळांनी आदळआपट करीत होती. मधूनमधून तिच्या तोंडून अशी जीव हादरवून टाकणारी किंकाळी निघे, की दोघेही काळीज धरून बसत. हिवाळ्य…
- 12विटी-दांडूआमच्या इंग्रजी शिकलेल्या मित्रांना पटो वा न पटो, मी तर हेच म्हणेन, की विटी-दांडू हा सगळ्या खेळांचा राजा आहे. आजही कधी पोरांना विटी-दांडू खेळताना पाहतो, तेव्हा जीव असा उचंबळून येतो की त्यांच्यात जाऊन खेळायला लागावे. ना लॉनची गरज, ना कोर्टची,…
- 13सव्वा शेर गहूकोणा एका गावात शंकर नावाचा एक कुरमी शेतकरी राहत होता. साधाभोळा, गरीब माणूस; आपण बरे की आपले काम बरे, कोणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही. छक्केपंजे त्याला ठाऊक नव्हते, लबाडी-कपटाचा त्याला वाराही लागला नव्हता. फसवले जाण्याची त्याला फिकीर नव्…
- 14शतरंजचे खेळाडूवाजिदअली शाहांचा जमाना होता. लखनौ विलासाच्या रंगात बुडून गेले होते. लहानथोर, गरीब-श्रीमंत, सारेच विलासात बुडालेले होते. कोणी नाचगाण्याची मैफल सजवी, तर कोणी नुसती अफूच्या गुंगीचीच लज्जत चाखीत पडे. जीवनाच्या प्रत्येक अंगात चैनीला आणि मौजमजेला…
- 15सद्गतीदुखी चमार दारात झाडू मारत होता आणि त्याची बायको झुरिया घर शेणाने सारवत होती. दोघांची आपापली कामे आटोपली, तेव्हा चमारीण म्हणाली—मग जाऊन पंडितबाबांना सांगून या की. नाहीतर कुठं निघून गेले म्हणजे झालं! दुखी—हां, जातो; पण हे तर ध्यानात घे, ते बस…
- 16कजाकीमाझ्या बालपणीच्या आठवणींत 'कजाकी' ही कधीही न पुसली जाणारी व्यक्ती आहे. आज चाळीस वर्षे उलटून गेली, पण कजाकीची मूर्ती अजूनही डोळ्यांसमोर नाचते आहे. त्या दिवसांत मी वडिलांबरोबर आझमगडच्या एका तहसिलीत होतो. कजाकी जातीने पासी होता; मोठा हसतमुख, म…
- 17परीक्षा(१) देवगड संस्थानचे दिवाण सरदार सुजानसिंह म्हातारे झाले, तेव्हा त्यांना परमेश्वराची आठवण झाली. त्यांनी महाराजांकडे जाऊन विनंती केली, की दीनबंधू! या दासाने चाळीस वर्षे श्रीमंतांची सेवा केली; आता माझे वयही उतरणीला लागले, राज्यकारभार सांभाळण्य…
- 18दुधाचे मोलआता मोठमोठ्या शहरांत सुइणी, नर्सी, लेडी डॉक्टर, सगळ्याच निपजल्या आहेत; पण खेड्यापाड्यांत बाळंतपणाच्या खोल्यांवर अजूनही भंगिणींचीच सत्ता चालते, आणि नजीकच्या काळात त्यात काही बदल होईल अशी आशा नाही. बाबू महेशनाथ आपल्या गावचे जमीनदार होते, शिकल…
- 19नशाईश्वरी एका बड्या जमीनदाराचा मुलगा, आणि मी एका गरीब कारकुनाचा; अंगमेहनतीखेरीज ज्याच्यापाशी दुसरी कसलीही मालमत्ता नव्हती अशा कारकुनाचा. आम्हा दोघांत सतत वादविवाद चालत. मी जमीनदारांची निंदा करी; त्यांना हिंस्र पशू म्हणे, रक्त शोषणाऱ्या जळवा म्…
- 20वाटणीभोला महतोची पहिली बायको वारल्यावर त्याने दुसरे लग्न केले, आणि त्याचा मुलगा रग्घू याचे वाईट दिवस सुरू झाले. त्या वेळी रग्घू अवघा दहा वर्षांचा होता. गावात मजेत विटी-दांडू खेळत हिंडत असे. नवी आई घरात येताच त्याला जात्याला जुंपून घ्यावे लागले.…
- 21लॉटरीझटपट श्रीमंत व्हायची हाव कोणाला नसते? त्या दिवसांत लॉटरीची तिकिटे आली, तेव्हा माझा मित्र विक्रम याचे वडील, काका, अम्मा आणि भाऊ या सगळ्यांनी एकेक तिकीट विकत घेतले. कोणाचे नशीब जोर करील, कोणी सांगावे? कोणाच्याही नावाने येवो, पैसा तर घरातच राह…
- 22सुजान भगत१ साध्याभोळ्या शेतकऱ्याच्या हाती पैसा आला की तो आधी धर्माकडे आणि कीर्तीकडे वळतो. सुसंस्कृत समाजासारखा तो आधी आपल्या चैनीमागे धावत सुटत नाही. सुजानच्या शेतात कित्येक वर्षे सोन्याचा पाऊस पडत होता. मेहनत तर गावातले सगळेच शेतकरी करीत, पण सुजानच…
- 23रामलीलागेली कित्येक वर्षे मी रामलीला पाहायला गेलेलो नाही. माकडांचे ओबडधोबड मुखवटे लावलेली, गुडघ्यापर्यंतच्या विजारी आणि काळे कुडते घातलेली माणसे 'हू-हू' करत धावताना पाहून आता हसू येते; मजा वाटत नाही. काशीची लीला जगप्रसिद्ध आहे. ऐकले आहे, की लोक दू…
- 24गवतवालीमुलिया हिरव्यागार गवताचा भारा घेऊन आली, तेव्हा तिचा गव्हाळ चेहरा जरा लालबुंद झाला होता आणि तिच्या मोठमोठ्या, मदभऱ्या डोळ्यांत धास्ती दाटली होती. महावीरने तिचा लालावलेला चेहरा पाहून विचारले—काय गं मुलिया, आज बरं वाटत नाही का? मुलियाने काहीच…
- 25आत्माराम( १ ) बेंदो गावात महादेव सोनार हा एक नामांकित माणूस होता. तो आपल्या पडवीत सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेगडीपुढे बसून खटखट करीत असे. हा अखंड आवाज ऐकण्याची लोकांना इतकी सवय होऊन गेली होती, की काही कारणाने तो थांबला म्हणजे काहीतरी हरवल्यासारखे व…
- 26मुक्तीचा मार्गशिपायाला आपल्या लाल पगडीचा, सुंदरीला आपल्या दागिन्यांचा आणि वैद्याला आपल्यासमोर बसलेल्या रोग्यांचा जो गर्व वाटतो, तोच शेतकऱ्याला आपली शेते डोलताना पाहून वाटतो. झींगुर आपल्या उसाच्या शेताकडे पाहत असे, तेव्हा त्याला जणू नशा चढे! तीन बिघे ऊस ह…
- 27मोटेरामजी शास्त्रीपंडित मोटेरामजी शास्त्रींना कोण ओळखत नाही? अधिकाऱ्यांचा कल पाहून पाऊल टाकणे हा त्यांचा बाणा. स्वदेशी चळवळीच्या दिवसांत त्यांनी त्या चळवळीला कडाडून विरोध केला होता. स्वराज्याच्या चळवळीच्या दिवसांतही त्यांनी अधिकाऱ्यांकडून राजनिष्ठेची सनद पदर…
- 28प्रेरणामाझ्या वर्गात सूर्यप्रकाशइतका उपद्व्यापी मुलगा दुसरा नव्हता; किंबहुना असे म्हणा ना, की अध्यापनाच्या दहा वर्षांत इतक्या अवघड स्वभावाच्या शिष्याशी माझी गाठ पडली नव्हती. लबाडीचे खेळ म्हणजे त्याचा जीव की प्राण. शिक्षकांची टर उडवण्यात आणि त्यांन…
- 29राणी सारंधा१ काळोख्या रात्रीच्या सन्नाट्यात खडकांवर आदळत वाहणारी धसान नदी, घुमघुम आवाज करीत फिरणाऱ्या जात्यांसारखी गोड वाटत होती. नदीच्या उजव्या काठावर एक टेकाड आहे. त्यावर एक जुना किल्ला उभा आहे; त्याला रानटी झाडांनी वेढून टाकले आहे. टेकाडाच्या पूर्व…
- 30राजा हरदौलबुंदेलखंडात ओरछा हे एक जुने राज्य आहे. तिथले राजे बुंदेले. या बुंदेल्यांनी डोंगरांच्या दऱ्याखोऱ्यांत आपले आयुष्य घालवले आहे. एके काळी ओरछ्याचे राजे होते जुझारसिंह. मोठे धाडसी आणि बुद्धिमान. त्या वेळी दिल्लीच्या तख्तावर शाहजहान बादशहा होते.…
- 31चढाओढ१ जोखू भगत आणि बेचन चौधरी यांच्यात तीन पिढ्यांपासून वैर चालत आले होते. शेताच्या बांधावरून काही तंटा होता. त्यांच्या पणजोबांच्या वेळी कित्येकदा रक्तपात झाला. वडिलांच्या काळापासून कोर्टकचेऱ्या सुरू झाल्या. दोघेही कित्येकदा हायकोर्टापर्यंत जाऊ…
- 32मिरवणूकपूर्ण स्वराज्याची मिरवणूक निघाली होती. काही तरुण, काही म्हातारे, काही मुले हातांत झेंडे-पताका घेऊन 'वन्देमातरम्' गात माल रस्त्यावरून पुढे गेले. दोन्ही बाजूंना बघ्यांच्या भिंती उभ्या होत्या—जणू या जथ्याशी त्यांचे काही देणेघेणे नाही, जणू हा क…
- 33दंडअल्लारक्खीच्या पगारातून काही ना काही दंड कापला गेला नाही, असा महिना क्वचितच जाई. कधीकधी तर ६ रुपयांपैकी ५ रुपयेच तिच्या हाती पडत; पण एवढे सारे सोसूनही ती सफाई खात्याचे दारोगा मु. खैरातअली खाँ यांच्या तावडीत मात्र कधी येत नसे. खाँसाहेबांच्या…
- 34मनोवृत्तीएखादी सुंदर तरुणी भल्या सकाळी गांधी पार्कमधल्या बिलोरी बाकावर गाढ झोपलेली आढळावी, ही दचकवणारीच गोष्ट. सुंदर स्त्रिया पार्कात हवा खायला येतात, हसतात, धावतात, फुलझाडांशी खेळतात; तिकडे कोणाचे लक्षही जात नाही. पण एखादी तरुणी वाटेकडेच्या बाकावर…
- 35लेखकसकाळी महाशय प्रवीणांनी वीस वेळा उकळलेल्या चहाचा प्याला तयार केला आणि साखर-दुधाशिवायच तो पिऊन टाकला. हीच त्यांची न्याहारी. गोड, दुधाळ चहा मिळून महिने लोटले होते. दूध आणि साखर त्यांच्या लेखी जीवनावश्यक वस्तूंत मोडत नव्हत्या. बायकोला उठवून पैस…